Monday, June 16, 2014

New article at Allexampapers.com: रसा��नशास्ञ

New article at Allexampapers.com (http://www.allexampapers.com/)
Article title: रसायनशास्ञ
Category: Indian State Services Examination > Maharashtra Public Service Commission (MPSC) > Competitive Examination > MPSC Notes > Science
This article was published.

View article:
http://www.allexampapers.com/index.php?option=com_content&view=article&id=891:2014-06-17-00-08-31&catid=176&Itemid=471
Your article id for futher reference is 891


...........Introtext overview:...........

 

रसायनशास्ञ

रॉबर्ट बॉईल ( १६२७ – १६९१ ) याला रसायन शास्त्राचा जनक म्हणतात. कारण रसायनशास्त्राचा पध्दतशीरपणे अभ्यास करणारा तो पहिला शास्त्रज्ञ होय.

आधुनिक रसायनशास्त्राचा जनक – ए. लावासिए. ( त्याने ऑक्सिजनला नाव दिले.) द्रव्य व द्रव्याचे गुणधर्म (Matter & Properties of Matter)

द्रव्यांच्या अवस्था – 

  1.  स्थायुरूप अवस्था ( घन ) ( Solid State )
  2.  द्रवरूप अवस्था (द्रव ) (Liquid State )
  3.  वायुरूप अवस्था ( वायु ) (Gaseous state )
  4. प्लाझ्मा ( Plasma)

यापैकी प्लाझ्मा ही अवस्था सूर्याच्या पृष्ठभागावर घडते, कारण त्या ठिकाणी अणुचे प्रचंड प्रमाणात आयनीभवन होते.

द्रव्याचे वर्गीकरण –

  1. मूलद्रव्ये (Elements ) 
  2. संयुगे (Compounds)
  3. मिश्रणे (Mixtures )

मूलद्रव्ये – ''ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही, अशा पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. ''आत्तापर्यंत रसायनशास्त्रज्ञांना १०९ ( इ. स. १९८४ ) मूलद्रव्यांचा शोध लावण्यात यश आले आहे. त्यापैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात व इतर मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत.

मूलद्रव्याचे वर्गीकरण -

  1. धातू
  2. अधातू या प्रकारात करतात.

धातू (Metals) -

  • धातूंना चकाकी असते.
  • धातू तंतूक्षम / तन्य (Ductile) असतात.
  • हे वर्धनीय (Malleable) असतात.
  • हे उष्णता व विद्युत यांचे सुवाहक असतात. सर्व धातू स्थायूरूप असतात.
  • पारा हा धातू मात्र अपवाद असून तो कक्ष तापमानाला द्रवरूपात असतो.
  • धातूची उदा – तांबे(Cu) , लोखंड(Fe) , ऍल्युमिनिअम(Al) , सोने (Au)y , चांदी(Ag) , पारा(Hg) इ.

अधातू (Non – Metals) – 

  • अधातू पदार्थ स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेत आढळतात.
  • सर्वसामान्यपणे अधातूंना चकाकी नसते. हे उष्णता व विद्युत यांचे दुर्वाहक आहेत.
  • अपवाद – आयोडिन स्फटिक चमकदार असतात, ग्रॅफाइट स्वरूपात ( अपरूपात) असलेला कार्बन विद्युत सुवाहक असतो.
  • अधातू वर्धनीय नाहीत. तसेच ते तन्यही नाहीत.
  • अधातू – फॉस्फरस, कार्बन, गंधक, आयोडिन हे स्थायुरूप आहेत तर ब्रोमीन द्रवरूप अवस्थेत असतो.
  • ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, निऑन हे सर्व कक्ष तापमानाला वायुरूप अवस्थेत असतात.

No comments:

Post a Comment