Article title: संगणक (Computer)
Category: Indian State Services Examination > Maharashtra Public Service Commission (MPSC) > Competitive Examination > MPSC Notes
This article was published.
View article:
http://www.allexampapers.com/index.php?option=com_content&view=article&id=901:computer&catid=163&Itemid=471
Your article id for futher reference is 901
...........Introtext overview:...........
संगणक (Computer)
- संगणकाची १८२१ मध्ये सर्वप्रथम संकल्पना मांडली – चार्ल्स बॅवेज
- पहिला आधुनिक कॉम्प्युटर बनविला – १९२५ (बॅने बुश)
- पहिला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर – १९४५ ( जॉन एखर्ट व जॉन मॉचली)
संगणकाचे विभाग-
- इनपुट युनिट – माहिती ग्रहण करण्यासाठी माऊस, कि-बोर्ड, जॉय स्टिक, वेब कॅम, टच स्क्रिन, डिजीटल पेन, बॉयोमेट्रिक्स स्कॅनर, डिजीटल कॅमेरा
- मेमरी- माहिती साठवून ठेवण्यासाठी
- A. L. U. – ऍरीथमॅटिक लॉजिक युनिट (प्रत्यक्ष काम करण्यासाठी)
- कंट्रोल युनिट - संगणकाच्या सर्व भागाचे कंट्रोल युनिट
- आऊटपुट - माहिती मिळविण्यासाठी साधने- प्रिंटर, मॉनिटर, स्पिकर्स, प्लॉटर्स, हेडफोन, प्रोजेक्टर
- स्ट्रोरेज डिव्हाईस – १. फ्लॉपी ड्राइव्ह २. हार्ड डिस्क ड्राइव्ह ३. कॉम्बो ड्राइव्ह ४. डिजीटल पेन ५. ऑप्टिकल झिप ड्राइव्ह, मेमरी, A. L. U. कंट्रोल युनिट यांनाच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सी. पी. यु.) असे म्हणतात. यालाच संगणकाचा आत्माही म्हणतात.
प्रकार –
- पर्सनल ( P. C )- यांनाच मायक्रो कॉम्प्युटर असेही म्हणतात, याचा उपयोग घरगुती वापर, स्वतःसाठी, कार्यालयातील कामकाजांसाठी केला जातो.
- मिनी – कार्यालयात वापरला जातो. वैयक्तिक संगणाकापेक्षा हे महाग व जास्त कार्यक्षम असतात.
- सुपर कॉम्प्युटर – सर्वात जलद व अतिमहाग, हवामानाची अंदाज वर्तनिणे, जमिनिवरील निरीक्षण केंद्रासाठी वापर करतात.
- मेनफ्रेम – अनेकजण एकाचेवेळी काम करू शकतात. विद्यापीठ व संशोधन संस्था, गुंतागुंतीची आकडेवारी, तसेच बँका,ONGC, मोठे कारखाने उद्योगात वापरला जातो.
हार्डवेअर – गुंतागुंतीची इलेक्ट्रॉनिक जोडणी, चुंबकीय यांत्रिक उपकरणे इत्यादी सर्वांचा समावेश यामध्ये होतो.
सॉफ्टवेअर – हार्डवेअरचा उपयोग करून माहिती मिळविण्याकरिता दिल्या जाणा-या सुचनांचा संच म्हणजे सॉफ्टवेअर होय.
भाषा-
कॉम्प्युटर प्रोग्रामसाठी विकसित पहिली भाषा -फोट्रॉन
BSIC – बीगीनर्स ऑल परपज इन्स्ट्रक्शन कोड साठी साधी सरळ भाषा अतिशय लोकप्रिय आहे.
COBEL – कॉमन बिझनेस ओरिएन्टल लॅंग्वेज – व्यापार उद्योगक्षेत्रात वापरली जाते.
FORTRAN- फॉर्म्युला ट्रान्सलेशन – वैज्ञानिक संशोधन, तंत्रविज्ञान व अभियांत्रिकी संस्था यासाठी वापर
ALGOR – अलगोरिदम लॅग्वेज – वैज्ञानिक संशोधन व तंत्रविज्ञान इ. यासाठी वापर
PL- प्रोग्राम लॅग्वेज – बहुउद्देशीय वापरासाठी.
PASKAL – गणित व इंजिनियरींग यासाठी वापर केला जातो.
इतर प्रचलीत भाषा – डेल्फी -१ ही भाषा बोरलॅडने १९९५ मध्ये तयार केली. त्याचप्रमाणे डेल्फी 3, C, C++, Visual C, (JAVA) जावा, व्हिज्युल बेसिक, एच. टी. एम. एल. इ.
संगणकाच्या पिढ्या- संगणकाचा आकार, आराखडा, वेग व क्षमता यांयुसार
वर्गीकरण
- संगणकाच्या पहिल्या पिढीत – १९४६ – ५९ वापर केला गेला. – व्हॅक्यूम ट्यूब्स
- संगणकाच्या दुस-या पिढीत -१९५९ -६५ मध्ये वापर केला गेला- ट्रॉन्जिस्टर
- संगणकाच्या तिस-या पिढीत – १९६५ -७९ मिनी कॉम्प्युटर, मायक्रो कॉम्प्युटर, पर्सनल कॉम्प्युटर यात वापर केला गेला- एन्टीग्रेटेड सर्किट- (आय. सी.)
- चौथ्या पिढीत – १९८९ पासून आद्यपपर्यंत वापर केला जात आहे. – एल. एस. आय व व्ही. एस. एल. आय.
- संगणकाच्या पाचव्या पिढीतील भविष्यात निर्माण होणारे वैशिष्ट्य – कृत्रिम बुध्दिमत्ता
जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक्स डिजीटल कॉम्प्युटरचे नाव – एनियाक (ENIAC)
भारतात पहिला कॉम्प्युटर बनविला – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. (१९७१) – सिध्दार्थ
जगातील सर्वाधिक वेगवान कॉम्प्युटर IBM कंपनीने बनविला. International Business Machine
भारतात प्रथम हिंदीत पर्सनल कॉम्प्युटर IBM कंपनीकडून १५ डिसें. १९९७ मध्ये तयार केला गेला.
जागतिक बुध्दीबळपट्टू गॅरी कॅस्पोरोव्हरला पराजित करणारा कॉम्प्युटर – डीप ब्ल्यू कॉम्प्युटर
जगातील पहिला पर्सनल कॉम्प्युटर तयार करून बाजारात आणला. – आय. बी. एम. ने (१९८१)
सुपर कॉम्प्युटर्सची कार्य करण्याची क्षमता – ५०० मेगा फ्लॉप्स, मेमरी-५२ मेगा बाईट
पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव – ENIAC – IV
भारत सरकारने महासंगणक भारतात तयार करण्यासाठी स्थापन केलेली संस्था – सी- डॅक (C-DAC), सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटरिंग – पुणे – (१९८८)
भारताने प्रथम स्वदेशी बहुउद्देशीय सुपर कॉम्प्युटर परम C-DAC पुणे येथे १९९० मध्ये विकसित केला. त्याची क्षमता एक गिगा फ्लॉप्स, परम – १००००, परमअनंत, परमपद्मम
भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरने तयार केलेला सुपर कॉम्प्युटर – अनुपम
परम १०००० – पुणे येथे C-DAC मध्ये २८ मार्च १९९८ मधे विकसित केला.
क्षमता-१०० गेगा फ्लॉप्स या महासंगणक शोधाचे श्रेय विजय भटकर यांना दिले जाते.
परम १०००० चा उपयोग – हवामानाचे अंदाज वर्तविणे, भूकंपाविषयी अंदाज वर्तविणे, तेल व गॅस साठे संबंधी मॉडेल तयार करणे, वैद्यकीय, संरक्षण, अणु अस्त्रे, उपग्रह प्रक्षेपण इ. कामासाठी केला जातो.
परम अनंत – C-DAC निर्मित आणि व्यापारी क्षेत्र लोकाभिमुख बनवण्याच्या उद्देशाने पर्सनल कॉम्प्युटर परम अनंत ५ एप्रिल २००० मध्ये तयार केला गेला.
परम पद्म- देशातील सर्वात वेगवान संगणक, क्षमता १ टेराफ्लॉप (सी- डॅक निर्मित)
भारतात सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था – नॅसकॉम (NASSCOM)
भारतीय माहिती केंद्र- नीकनेट (NIC) National Information Center
शास्त्रीय शोध व त्याचा सर्वात कमी गर्भकाळ – कॉम्प्युटर क्षेत्रात
संगणक कार्यात विकास व संशोधन कार्यासाठी वापरले जाणारे एकूण मनुष्यबळ – ३० ते ५०%
डिजीटल व ऍनालॉगच्या आवश्यक बाबींचा उपयोग करून बनवलेला संगणक – हायब्रीड संगणक
C-DAC चे संचालक विजय भटकर यांना मिळालेला पुरस्कार – महाराष्ट्र भूषण
मॉनिटर स्क्रिनच्या आतिल भागास दिला जाणारा लेप – फॉस्फरस
संगणकाची मेमरी मोजली जाते. – किलोबाईटमध्ये
संगणकाची स्मरण शक्ती जेवढी जास्त तेवढा संगणकाचा वेग व शक्ती जास्त असते.
संगणकाची स्मरण शक्ती म्हणतात – RAM – Random access memory
संगणकाची स्मरणशक्ती मोजण्याचे एकक – बाईट
कॉम्प्युटरची भाषा २ अंकाची असते. (बायनरी डिजट) – ० व १.
० किंवा १ अंकांनी बनलेले संगणकाचे मूळ एकक – बीट
१) ० किंवा १ -१ बीट २) ८ बीटस् – १ बाईट ३)१किलो बाईट – १०२४ बाईट ४) १ मेगा ब बाईट – १०२४ के.बी. ५) १ गिगा बाईट (जीबी) – १०२४ एम बी. ६) १ टेरा बाईट- १०२४ जेबी
संगणकाचे पूर्व कामकाज ० ते १ बायनरीमध्ये चालते.
हार्डवेअर व सॉफ्टवेअर व्यवस्थित कम करण्यासाठी वापरल्या जाणा-या सॉफ्टवेअर प्रोग्रामचे नाव – ऑपरेटिंग सिस्टिम
जगातील सर्वाधिक वापरल्या जाणा-या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिम विंडोजच्या विविध आवृत्या – विंडोज -१.०, २.० , २.३, ३.० विंडोज ९५ ,९८ ,२०००. विंडोज एक्स. पी. विंडोज व्हिस्टा, व विंडोज – ७
जगात सर्वाधिक वापरली जाणारी मोफत असणारी ऑपरेटिंग सिस्टीम – ग्नू – लिनक्स
सायबर क्राईमः
- संगणाकाच्या प्रोग्राममध्ये किरकोळ बदल करुन सॉफ्टवेअर मालकाची परवानी न घेता कॉपीचा भंग करुन ते वापरणे. यास म्हणतात – क्रॅकींग
- फोटोच्या मागे गोपनीय माहीती लपविण्यास म्हणतात – स्टेग्नोग्राफी
- इतर व्यक्तीच्या संगणकातील माहीती चोरण्यास म्हणतात – स्निफिंगी
कॉम्प्युटर व्हायरस – म्हणजे मानव निर्मित डीजीटल परजीवी असतात. ते फाईल संक्रमण म्हणूनही ओळखले जातात. हे सजीव नसून एका विशिष्ट प्रकारे केलेले प्रोग्राम असतात. ज्यामुळे संगणकातील डाटा फाईल नष्ट होतात.
व्हायरस व प्रोग्राम मध्ये फरक नसतो त्यामुळे ते कोणत्याही सुचने शिवाय स्वतःच कार्यरत होतात.
पहिल्या कॉम्प्युटर व्हायरसचा विकास १९८५ मध्ये पाकिस्तानमधील दोन बधूंनी केला. त्याचे नाव होते- ब्रेन व्हायरस किंवा पाकिस्तानी व्हायरस
हॅकर- एखाद्या अनाधिकृत व्यक्ती द्वारा संगणक प्रणालीत प्रवेश करुन डाटा ( माहीती) पळविणे. अनाधिकृत पध्दतीने संगणक जाळ्यात प्रवेश करणा-यांना हॅकर ( Haiker ) असे म्हणतात, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना सायबर क्राईम असेही म्हणतात.
कॉम्प्युटरला व्हायरस पासून वाचविण्यासाठी ऍन्टीव्हायरस प्रोग्राम बनवतात.
सी. डी. – कॉम्पक्ट डिस्क, डी. व्ही. डी. –डिजिटल व्हॅर्से टाईल डिस्क, व्हि. सी. डी – व्हिडीओ कॉम्पॅक्ट डिस्क.
सी. डी. किंवा डि. व्ही. डी. वरचा कशाच्या साहाय्याने वाचला जातो.- लेझर.
रेल्वे रिझर्वेशन, बॅंकेतील कामे येथिल डाटा एन्ट्री ऑन लाईन असते.
लहान ब्रिफ केसच्या आकारा एवढा संगणकाचा प्रकार – लॅपटॉप संगणक
माणसाच्या तळहाताएवढा संगणकाचा प्रकार – पामटॉप संगणक (सर्वात लहान)
टेलिफोनच्या वायरीतून मजकूर एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पाठविण्यासाठी वापरले जाणारे साधन – मोडेम
इ. स. १९८१ मध्ये पहिले पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आणणा-या कंपनीचे नव – आय. बी. एम. (I.B.M.)
एका सुपर कॉम्प्युटरची क्षमता ४० हजार पर्सनल कॉम्प्युटर इतकी असते.
भारतात स्वतःची वेबसाइट सुरू करणारा पहिला राजकीय पक्ष – भारतीय जनता पार्टी
इंटरनेट (Internet)
१९६५ मध्ये अमेरिकन संरक्षण विभागाने अर्पानेटचा ( ARPANET ) विकास केला. १९८० मध्ये अर्पानेटचे विभाजन करून सैनिकी उपयोगासाठी एक विभाग व समान्यासाठी इंटरनेट हा विभाग केला. शोध – डॉ. विंट सर्फ
१९८९ मध्ये World Wide Web (WWW) मुळे इंटरनेट लोकप्रिय बनले.
भारतात इंटरनेटचा प्रवेश १९८७ -८८ मध्ये झाला तथापि विदेश संचार निगम. लि. द्वारा इंटरनेट सुविधा जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली. –
VSNL नंतर भारतात इंटरनेट सुविधा सत्यम इन्फोटेकने २१ नोव्हे. १९९८ मध्ये सुरू केली.
भारतात प्रथम व्यापारी ई. मेल सेवा ( I.C.N.E.T. या खाजगी कंपनीद्वारा ) नवी दिल्ली येथे ११ फेब्रु १९९४ पासून सुरू करण्या आली.
भारतात ई- कॉमर्सला संसदेची मान्यता – १७ मे २०००
मर्यादित क्षेत्रातील संगणक जोडण्यासाठी उदा- शासकीय कार्यालय, खाजगी उद्योग, कॉलेज इत्यादीत वापरले जाणारे नेटवर्क – लोकल एरिया नेटवर्क (LAN)
विस्तृत प्रदेशातील संगणक जोडण्यासाठी वापरले जाणारे नेटवर्क- WIDE AREA NETWORK-WAN टेलिफोन लाईन मध्ये लँड लाईनमध्ये फोन व इंटरनेट डेटा व व्हाईस एकाच वेळी वापरता येतात- ISDN CONNECTIONM
कॉपर वायर व ऑप्टीकल फायबरचा वापर करून मिळणारे इंटरनेट कनेक्शन VSDL (VERY HIGH SPEED) इंटरनेटच्या Ip (Internaert protocol) Address चे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्थापन बघणारी संस्थाअ- ICANN (Internationl corporation for assign names & address ) असे सॉफ्टवेअर ज्याच्या मदतीने इंटरनेटवर प्रवेश करता येतो. – ब्राऊजर
ज्या सॉफ्टवेअरच्या मदतीने इंटरनेट उपलब्ध असणारा माहितीचा शोध घेता येतो त्याचे नाव – सर्चइंजिन
अरनेट – (ERNET) – शिक्षण संस्था व संशोधक संस्थांना जोडणारे जाळे यास अरनेट ही संज्ञा आहे.
विद्या वाहिनी योजना – पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ जून २००३ ला विद्यालयाचे संगणकीकरण करण्यासाठी विद्यावाहिनी ही योजना सुरू केली. यामध्ये सर्वप्रथम १९९१ मध्ये भारतात इंटरनेटचा पहिला अनुभव आला.
पहिले संगणक साक्षर गाव – केरळमधील मालापुरम जिल्ह्यातील अमरावतम गाव या ८५० कुटूंब असलेल्या गावातील प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक सदस्य संगणक साक्षर आहे.
रोबो – T – औद्योगिक रोबो हा ०.०००५ अचूक भोके पाडतो. F-16 लढाऊ विमानांची जुळणी करतो.
No comments:
Post a Comment